रेल्वेतील स्टंटबाजीमुळे 250 बळी

By admin | Published: November 25, 2014 10:49 PM2014-11-25T22:49:26+5:302014-11-25T22:49:26+5:30

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे प्रवाशांचे स्टंट्स, रेल्वे क्रॉसिंग आणि यासारख्या घटनांमुळे होणा:या अपघातांनी ग्रासत आहे.

250 sticks due to the stunts of the train | रेल्वेतील स्टंटबाजीमुळे 250 बळी

रेल्वेतील स्टंटबाजीमुळे 250 बळी

Next
वैभव गायकर ल्ल नवी मुंबई
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे प्रवाशांचे स्टंट्स, रेल्वे क्रॉसिंग आणि यासारख्या घटनांमुळे होणा:या अपघातांनी ग्रासत आहे. वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर स्टंटबाजी, अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग हे प्रकार कमालीचे वाढले असून या प्रकारातून होणा:या अपघातात मृत्युमुखी पडणा:यांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. यावर्षी बळींची संख्या 25क् च्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षीची आकडेवारी पाहिली असता यावर्षीची संख्या अधिकच आहे. 
 काही वर्षापूर्वी केवळ मुंबई महानगरीचीच जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गेल्या काही वर्षात नवी मुंबईचीही जीवनवाहिनी बनलेली आहे. वाशी ते पनवेल या दरम्यानचे प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या फे:यांतही वाढ झालेली आहे. मात्र, या दरम्यान प्रवाशांची, स्थानिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे क्रॉसिंग करणा:यांविरोधात कडक पावले उचलली, मात्र त्यालाही योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही हेच रेल्वे अपघातातील बळींच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. 
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या परिसरात पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, बेलापूर, खारघर आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. चालू वर्षात या मार्गावर 61 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मागीलवर्षी ही संख्या 53 होती. वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत गोवंडी ते सीवूड्स आणि वाशी ते रबाळे या ट्रान्सहार्बर मार्गावर मोठय़ा रेल्वे स्थानकांचा समावेश असल्याने याठिकाणी अपघातांची संख्याही मोठीच आहे. चालूवर्षात याठिकाणी 19क् जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागच्या वर्षी ही संख्या 18क् एवढी होती. स्टंटबाजी व मुख्यत्वे अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग ही अपघाताची मुख्य कारणो आहेत. 
हार्बर मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबईत सिडकोमार्फत काही स्थानके विकसित केली आहेत, मात्र अनेक ठिकाणी संरक्षण भिंती नसल्यामुळे  प्रवासी रूळ ओलांडतात व आपला जीव धोक्यात घालतात. सर्वात अपघातग्रस्त म्हणून तुर्भे नाका, सानपाडा दत्तमंदिर, ऐरोली, नेरुळ, बेलापूर खिंड, पनवेल रेल्वे स्थानकाचा परिसर हे अपघातांसाठी हॉट स्पॉट असल्यामुळे याठिकाणी रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना राबविण्याची गरज आहे. 
 
पादचारी पूल हवा
च्ऐरोली नाका, तुर्भे नाका यासारख्या प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकादरम्यान पादचारी पूल उभारल्यास अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात आळा बसेल, तसेच आग्रोळी आणि बेलापूरच्या दरम्यान जोडणारा भुयारी मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाल्यास याठिकाणी होणारे अपघातही काही प्रमाणात कमी होतील. 
 
रेल्वे प्रशासनासह रेल्वे पोलिसांमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यामध्ये अपघात टाळण्यासाठी गाडय़ांना पत्रके लावणो, जाहिरातीमार्फत जनजागृती, सूचना फलक लावणो, वेळोवेळी प्रवाशांना अपघाताबद्दल सतर्क केले जात आहे. तरीही अनेक रेल्वे प्रवासी नियम धाब्यावर बसवत असल्याने अपघातांच्या संख्या वाढत आहे.
- राजेंद्र भोसले, पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस ठाणो. 

 

Web Title: 250 sticks due to the stunts of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.