वैभव गायकर ल्ल नवी मुंबई
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणा:या लोकल सेवा मार्गावर अपघातांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. रेल्वे प्रशासना आणि पोलींसाच्या सुरक्षेसंदर्भात तोकडय़ा उपाययोजना तसेच प्रवाशांची स्टंटबाजी, अनधिकृत रेल्वे क्रॉसिंगमुळे वाशी ते पनवेल मार्गावर चालू वर्षात आतार्पयत 250 जणांचे बळी गेले आहेत.
गेल्या काही वर्षात नवी मुंबईत लोकल रेल्वे सेवेचा विस्तार झाला. नवी मुंबईत प्रवासी वाढल्याने वाशी ते पनवेल या दरम्यान रेल्वेच्या फे:यांतही वाढ झाली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने रेल्वे क्रॉसिंग करणा:यांविरोधात कडक पावले उचलली असली तरी प्रवाशांनी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. हेच रेल्वे अपघातातील बळींच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या परिसरात पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, बेलापूर, खारघर आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. चालू वर्षात या मार्गावर 61 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मागीलवर्षी ही संख्या 53 होती. वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत गोवंडी ते सीवूड्स आणि वाशी ते रबाळे या ट्रान्सहार्बर मार्गावर मोठय़ा रेल्वे स्थानकांचा समावेश असल्याने याठिकाणच्या अपघातांची संख्याही मोठीच आहे. चालू वर्षात याठिकाणी 19क् जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागच्या वर्षी याच हद्दीत 18क् प्रवाशांचा विविध अपघातांमध्ये प्राण गेला होता. स्टंटबाजी व मुख्यत्वे अनधिकृत रेल्वे क्रॉसिंग ही अपघाताची मुख्य कारणो आहेत.
हार्बर मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या दरम्यान अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत असतात. नवी मुंबईत सिडकोने काही स्थानके विकसित केली आहेत. मात्र अनेक ठिकाणी संरक्षण भिंती नसल्यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याची जोखीम पत्कारतात. सर्वात अपघातग्रस्त म्हणून तुर्भे नाका, सानपाडा दत्तमंदिर, ऐरोली, नेरुळ, बेलापूर खिंड, पनवेल रेल्वे स्थानकाचा परिसर हे अपघातांसाठी हॉट स्पॉट आहेत. या ठिकाणी रात्रीच्यावेळी प्रवाशांवर रुळांलगतच्या झाडीमधून हल्ले होण्याची शक्यता असते. रेल्वे पोलिसांमार्फत अपघात रोखण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र तरीही अनेक रेल्वे प्रवासी नियम धाब्यावर बसवून प्रवास करीत असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
च्ऐरोली नाका, तुर्भे नाका यासारख्या प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्थानकादरम्यान पादचारी पूल उभारल्यास अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात आळा बसेल, तसेच आग्रोळी आणि बेलापूरच्या दरम्यान जोडणारा भुयारी मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाल्यास याठिकाणी होणारे अपघातही काही प्रमाणात कमी होतील.
तुर्भे नाका बनला मृत्यूचा सापळा
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
ट्रान्सहार्बर मार्गावरील तुर्भे नाका परिसरातील रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. परंतु रेल्वे, सिडको व महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
ट्रान्सहार्बर मार्गामुळे ठाणो व नवी मुंबईतील हजारो प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु हा मार्ग तुर्भे गाव, तुर्भे नाका, हनुमान नगर व इंदिरा नगरमधील रहिवाशांसाठी मात्र मृत्यूचा सापळा बनला आहे. तुर्भे गावात असलेले जनता मार्केट व इतर व्यापारी पेठेमुळे या ठिकाणी रोज हजारो नागरिकांची ये - जा होत असते. या सर्वाना येण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तुर्भे नाक्यावर रेल्वे रूळ ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. रूळ ओलांडताना वारंवार अपघात होत आहेत. महिन्याला 2 ते 3 अपघात होत आहेत. 24 ऑक्टोबरला एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला होता. या मार्गावर रेल्वे ट्रक टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून नागरिकांनी या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची मागणी केली आहे.
तुर्भे नाक्यावरील शेकडो विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रूळ ओलांडून तुर्भे गावातील शाळेत जात आहेत. रेल्वे प्रशासन, सिडको व महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आतार्पयत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आतार्पयत खासदार व आमदारांनीही या प्रश्नाला प्राधान्यक्रम दिलेला नाही. 2क्क्9 र्पयत खासदारांनी याकडे लक्षच दिले नाही. यानंतर खासदार संजीव नाईक यांनी प्रयत्न केले, परंतु प्रश्न मार्गी लागला नाही. विद्यमान खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वीच दौरा करून काम लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या. परंतु नागरिकांचा आता या दौ:यांवर विश्वास राहिलेला नसून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
लोकप्रतिनिधी उदासीन
च्मंगळवारी विद्याथ्र्याचा अपघात झाल्यानंतर स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, नगरसेवक अमित मेढकर व इतर लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी हजेरी लावली.
च्परंतु नागरिक अनेक वर्षापासून पादचारी पुलासाठी आग्रही असताना नगरसेवक, आमदार, खासदारांनी मात्र या पादचारी पुलाच्या कामास प्राधान्यक्रम दिलेला नाही. यामुळेच आतार्पयत पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याची टीका नागरिक करत आहेत.
अजून किती बळी घेणार?
च्तुर्भे नाक्यावर वारंवार अपघात होत आहेत. आम्ही पादचारी पुलाची वारंवार मागणी करत आहोत, परंतु दखल घेतली जात नाही.
च्अजून किती जणांचे बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार, असा प्रश्न येथील रहिवासी राजू शेख व अमोल टेंकाळे यांनी उपस्थित केला आहे.