मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. नोव्हेंबर महिन्यात पगार १ तारखेला होणार आहे. पगारवाढीतील थकबाकीची ५ हप्त्यांमधील रक्कम १ नोव्हेंबरच्या आत देण्यात येईल.अधिकाºयांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आॅक्टोबर, २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्यात २ टक्के वाढ होणार आहे. आॅक्टोबर, २०१८च्या वेतनात वाढीव महागाई भत्ता देण्यात येईल.अधिकाºयांना वेतनवाढ देण्यासाठी मंत्रालयातील दोन निवृत्त अधिकाºयांची वेतन समिती स्थापन केली आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर होईल. अहवाल येईपर्यंत एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात आली आहे.एसटी कामगारांना दिवाळी भेट मिळावी. वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला करावे, अशी मागणी होती. दोन्ही मागण्या मान्य झाल्याने आम्ही समाधानी आहोत, असे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना २,५००, अधिकाऱ्यांना ५,००० बोनस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 6:08 AM