मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून २०१० ते २०१७ दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्यांकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने विद्यापीठाकडून २०१० ते २०१७ यावर्षांत उतरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम आणि पुनर्मुल्यांकनांसाठी होणारा एकूण खर्च याबाबतची माहिती ही माहिती अधिकारातून मिळावी, यासाठी अपील केले होते. ही माहिती मिळालीनाही. परिणामी, एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा माहिती मागविण्यासाठी आकाशने राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. तरीही मुंबई विद्यापीठाने माहिती दिली नाही. परिणामी राज्य माहिती आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड मुंबई विद्यापीठाला ठोठावला आहे. तसेच कुलगुरुंना या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाबाबतची माहिती न दिल्याने विद्यापीठाला २५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:51 AM