मालमत्ताकराचे २५१ कोटी वसूल

By admin | Published: March 2, 2015 11:05 PM2015-03-02T23:05:44+5:302015-03-02T23:05:44+5:30

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस पावले उचलल्याने मालमत्ताकर विभागाने यंदा २८ फेबु्रवारीअखेर ७५ टक्के वसुली केली आहे.

251 crore of property tax collected | मालमत्ताकराचे २५१ कोटी वसूल

मालमत्ताकराचे २५१ कोटी वसूल

Next

ठाणे : आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस पावले उचलल्याने मालमत्ताकर विभागाने यंदा २८ फेबु्रवारीअखेर ७५ टक्के वसुली केली आहे. उर्वरित २५ टक्के वसुली ही महिनाभरात पूर्ण केली जाणार असल्याचा दावा प्रशासनाने
केला आहे. सुमारे २५१ कोटी
१५ लाख ४ हजार ४२२ रुपये
तिजोरीत जमा केले असून सर्वाधिक ९५ टक्के वसुली ही नौपाडा प्रभाग समितीने तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात अवघी ३५ टक्क्यांची वसुली झाली आहे.
जयस्वाल यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पालिकेची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावलेली होती. कर्मचाऱ्यांचा पगार निघेल की नाही, याबाबतही साशंकता होती. त्यामुळे त्यांनी एलबीटीची वसुली करण्याबरोबरच मालमत्ताकर आणि पाणीकराची अधिक वसुली कशी करता येऊ शकते, यावर अधिक भर दिला.
त्यानुसार, मालमत्ताकराच्या वसुलीसाठी थकबाकीदारांना दंडात १०० टक्के सूट दिली़ त्यामुळे १५ फेबु्रवारीपर्यंत २० हजार करदात्यांनी दंडात १०० टक्के सूट मिळवून ६५ कोटींचा मालमत्ताकर भरला. तसेच मागील महिन्यात दोन दिवसांत या विभागाने ९ कोटींची वसुली केली होती.

४दरम्यान, मालमत्ताकर विभागाला २०१४-१५ अंतर्गत ३३५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
४यामध्ये ९६ कोटींची थकबाकी, ८६ कोटी १२ लाख प्रशासकीय आकार आणि चालू वर्षाच्या २३५ कोटी मागणीचा समावेश आहे.
४त्यानुसार, २८ फेबु्रवारी २०१५ अखेर मालमत्ताकर विभागाने २५१ कोटी १५ लाख ४ हजार ४४२ रुपयांची वसुली केली आहे.
४यामध्ये नौपाडा प्रभाग समितीने ९५ टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण केले असून आतापर्यंत २९ कोटी ८७ लाख ११ हजार ७७ रुपयांची वसुली केली आहे़

Web Title: 251 crore of property tax collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.