सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:05 AM2021-04-29T04:05:17+5:302021-04-29T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे ...

256 Oxygen Concentrator arrives at Mumbai Airport from Singapore | सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल

सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या दोन दिवसांत सिंगापूरहून २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल झाले.

सिंगापूर एअरलाइन्सच्या मदतीने मंगळवार आणि बुधवारी दोन टप्प्यांत ही मदत मुंबई विमानतळावर दाखल झाली. प्राधान्यक्रमाने अवघ्या १५ मिनिटांत ही सर्व मदत उतरविण्यात आली. जगभरातून वैद्यकीय मदत दाखल होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने विशेष व्यवस्था उभी केली आहे. त्यानुसार, वैद्यकीय मालाला सर्वोच्च प्राधान्य देत, तो उतरविण्यापासून संबंधित यंत्रणेच्या हाती सुपुर्द करण्यासाठी जलद कृतिदल तयार केले आहे. त्याशिवाय अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देत, कोरोनाविरोधातील लढ्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 256 Oxygen Concentrator arrives at Mumbai Airport from Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.