Join us

लोकलमधील गर्दीचे २५६ बळी! गेल्या पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:34 AM

साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते.

प्रसन्न राणे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते. गेल्या ५ महिन्यांत या गर्दीमुळे २५६ प्रवाशांनी आपला जीव गमावला. तर ५८१ प्रवासी जखमी झाले आहेत. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाची वेळेवर इच्छितस्थळ, कार्यालय, शाळा-महाविद्यालय गाठण्यासाठी  धावपळ सुरू असते. या जीवघेण्या प्रवासात आतापर्यंत २२६ पुरुष, तर २४ महिला असे एकूण २५० प्रवासी धावत्या लाेकलमधून पडले, तर खांबाची धडक बसल्याने २ आणि रेल्वे गाडी व फलटाच्या माेकळ्या जागेत पडून ४ असे एकूण २५६ प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत.

१९ जण बेपत्तारेल्वेच्या गर्दीत जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत ८० जण बेपत्ता झाल्याची नाेंद लाेहमार्ग पाेलिसांनी केली आहे. यापैकी ६१ जणांचा शाेध लागला असून, अद्याप १९ जण बेपत्ता आहेत.

मृत्यूची कारणे

  • रुळ ओलांडून     ५०७    
  • नैसर्गिक मृत्यू     १८५
  • आत्महत्या     ३८
  • शाॅक     २
  • अन्य     १२
टॅग्स :मुंबईरेल्वेमृत्यू