26/11 Terror Attack : ...तर कसाब आणि अबू इस्माईल सीएसएमटी स्टेशनातून बाहेर पडूच शकले नसते!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:25 PM2018-11-26T12:25:03+5:302018-11-26T12:57:08+5:30

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे.

26-11 Mumbai Terror Attack: Cops were afraid, let Ajmal Kasab flee from railway station: media person | 26/11 Terror Attack : ...तर कसाब आणि अबू इस्माईल सीएसएमटी स्टेशनातून बाहेर पडूच शकले नसते!

26/11 Terror Attack : ...तर कसाब आणि अबू इस्माईल सीएसएमटी स्टेशनातून बाहेर पडूच शकले नसते!

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी स्टेशन परिसरात उपस्थित असलेले पोलीस भयभीत झाल्याचे दिसून आल्याचं सबॅस्टियन डि'सुझा यांनी म्हटलं आहे.पोलिसांनी कसाब आणि अबू इस्माईलला ठार मारले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते असे डि'सुझा यांनी म्हटलं आहे.

मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. मात्र मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी स्टेशन परिसरात उपस्थित असलेले पोलीस भयभीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी सीएसएमटी स्टेशनातून पळ काढल्याचे फोटोग्राफर सबॅस्टियन डि'सुझा यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर बेछूट गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो सबॅस्टियन डि'सुझा यांनी टिपले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

डि'सुझा यांनी काढलेला कसाबचा फोटो न्यायालयात त्याच्याविरुद्धच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरला होता. मात्र स्टेशन परिसरात असलेल्या पोलिसांनी कसाब आणि अबू इस्माईलला ठार मारले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते असे सबॅस्टियन डि'सुझा यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. 



सबॅस्टियन डि'सुझा दहा वर्षांपूर्वी मुंबई मिरर या दैनिकात फोटो एडिटर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी कसाबचा फोटो काढला. सध्या ते निवृत्त झाले असून गोव्यात राहतात.  सीएसएमटी स्टेशनवर हल्लेखोर गोळीबार करत असताना डि'सुझा फोटो काढत राहिले. त्यातल्याच एका फोटोत कसाब कार्गो पँट, टी-शर्ट घालून, हातातल्या रायफलसह स्टेशनवर चालताना दिसतो. कसाबवरील आरोप सिद्ध झाल्यावर 2010 मध्ये त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवल्यावर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.





 

Web Title: 26-11 Mumbai Terror Attack: Cops were afraid, let Ajmal Kasab flee from railway station: media person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.