२६ मोठे सिंचन प्रकल्प २०१९पर्यंत पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 05:40 AM2018-03-17T05:40:52+5:302018-03-17T05:40:52+5:30
राज्यातील मोठे २६ सिंचन प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रकल्पांचा समावेश पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.
Next
मुंबई : राज्यातील मोठे २६ सिंचन प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रकल्पांचा समावेश पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.
ते म्हणाले, राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसार पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत २६ प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित केले जातील. राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी कठोर नियम केले आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू लागणार असल्यामुळे वाळूधोरण आणणार आहे़