प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या २६ गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:37+5:302021-05-08T04:06:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ...

26 Central Railway trains canceled due to poor response from passengers | प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या २६ गाड्या रद्द

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या २६ गाड्या रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ज्या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे त्या विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी १० मे पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर / पुणे / मनमाड / अमरावती / सोलापूर / नागपूर / लातूर / जालना या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दादर-पंढरपूर, दादर-साईनगर शिर्डी, लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम एक्स्प्रेस, पुणे अहमदाबाद, पुणे फलटण, फलटण लोणंद या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परराज्यातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-गोरखपूर आणि पुणे-हटिया या विशेष अति जलद रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.

* पश्चिम रेल्वेच्या १७ हून अधिक गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस - भुसावळ खानदेश स्पेशल, वांद्रे टर्मिनस- भगत की कोठी स्पेशल, वांद्रे टर्मिनस– महुवा सुपरफास्ट स्पेशल, पुणे- अहमदाबाद स्पेशल, अहमदाबाद - पुणे स्पेशल अशाप्रकारे १७ हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

.............................

Web Title: 26 Central Railway trains canceled due to poor response from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.