मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात आणि त्यामुळे उपनगरीय लोकल पूर्णपणे विस्कळीत होते. हे पाहता रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. यंदाही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जाऊ नयेत आणि झाडांच्या फांद्या ट्रॅकवर पडून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रेल्वेने ट्रॅकवर पाणी तुंबणाऱ्या २६ ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले असून, यात मध्य रेल्वेवरील १७ तर पश्चिम रेल्वेवरील ९ ठिकाणांचा समावेश आहे. मध्य रेल्वेचा पसारा हा कर्जत, कसारा, खोपोली आणि हार्बरचा पनवेलपर्यंत आहे. तर पश्चिम रेल्वे डहाणूपर्यंत पसरलेली आहे. पावसाळ्यात या दोन्ही सेवांना मोठा फटका बसतो. ट्रॅकवर पाणी साचणे, झाडांच्या फांद्या तुटून त्या ओव्हरहेड वायरवर किंवा ट्रॅकवर पडण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. त्यामुळे लोकल सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असल्याने पावसाळ्यातील प्रवास प्रवाशांना नकोसा होतो. हे पाहता यंदा पावसाळ्यात लोकल सेवा पूर्ववत राहण्यासाठी रेल्वेकडून पावसाळापूर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून ट्रॅकवर पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांचा माहिती घेण्यात आली असून, अशी एकूण २६ ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले आहे. यात मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे, डोंबिवली, हार्बवरील शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे तसेच मेन लाइनवरीलच दक्षिण पूर्व सब-वे किलोमीटर ६५/७-८ आणि सब-वे किलोमीटर ७५/१-२ चा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स, चर्नी रोड ते ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन रोड, दादर, माहीम, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि नालासोपारा ते विरार या ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या ट्रॅकवर पाणी साचू नये यासाठी रेल्वेकडून ट्रॅक थोडेफार वरही उचलण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेकडून ४३ नाल्यांची सफाई करण्यात येत असून, मध्य रेल्वेवरील ८७ पैकी ८४ नाल्यांची सफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)च्पाणी तुंबणाऱ्या १७ ठिकाणी पाणी उपसणारे २५ पंप लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणी साचण्याचा धोका राहणार नाही. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेकडून १५ ठिकाणी १६ पंप लावण्यात येणार आहेत. यामध्ये माझगाव यार्ड, मस्जीद बंदर पूर्व दिशेला, चिंचपोकळी स्थानक, परेल स्थानक, सायनजवळील मुखगपाक नाला,सायन स्थानकाजवळील एलबीएस मार्ग, गौरीशंकर वाडी, विद्याविहार स्थानक पूर्व दिशेला, घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान, भांडुप प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ, नाहूर स्थानक पूर्व दिशेला आणि शिवडी स्टेशन गेट नंबर एकजवळ पंप बसविण्यात येणार आहेत. च्ओव्हरहेड वायर आणि ट्रॅकवर झाडांच्या फांद्या पडून लोकल सेवा विस्कळीत होते. अशा ७00 ठिकाणी असलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी ९५0 मल्टी सेक्शन डिजिटल एक्सेल काउंटर यंत्रणा बसविण्यात आली आहे. च्नऊ ठिकाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करतानाच चर्चगेट यार्ड, दहिसर ते मीरा रोड, भार्इंदर यार्ड, नालासोपारा ते विरारदरम्यानचे ट्रॅक थोेडे वर उचलण्यात आले आहेत.च्४३ नाल्यांची सफाई करण्यात येत असून, पालिकेकडून निधीही उपलब्ध करण्यात आला आहे. ३0 मेपर्यंत ही सफाई पूर्ण केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही मोठ्या नाल्यांची सफाईही पालिकेकडून केली जाणार आहे.च्पाणी तुंबणाऱ्या आणि अन्य काही ठिकाणी ८0 डिझेल पंप मशिन बसविण्यात येणार आहेत. लोकल गाड्यांच्या सफाईवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच या गाड्यांची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेची २६ धोकादायक ठिकाणे
By admin | Published: May 22, 2015 10:42 PM