‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:56 PM2023-10-11T12:56:48+5:302023-10-11T12:58:00+5:30

जप्त केलेल्या मालमत्तेत २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

26 flats, shops of 'Chandamama' owners seized; ED action, 40 crores worth of assets seized | ‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच

‘चंदामामा’च्या मालकांचे २६ फ्लॅट्स, दुकाने जप्त; ईडीची कारवाई, ४० कोटींच्या मालमत्तेवर टाच

मुंबई : लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या चंदामामा या मासिकाची निर्मिती करणाऱ्या तसेच दुसरीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिओदेसिक या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची ४० कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

कंपनीच्या समभागधारकांच्या पैशांवर डल्ला मारत ते हडप करत खासगी मालमत्तांची खरेदी केल्याप्रकरणी २०१८ मध्ये कंपनीच्या संचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, देशातच नव्हे तर परदेशात देखील कंपनीने काही क्लिष्ट आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. उपलब्ध माहितीनुसार, २००८ मध्ये कंपनीने १२५ मिलियन अमेरिकी डॉलर इतक्या महाकाय रकमेच्या परदेशी रोख्यांची विक्री केली होती. 

- परदेशात काही कंपन्यांची खरेदी करणे तसेच मूळ कंपनीचा विस्तार करण्यासाठी या पैशांची उभारणी केल्याचा दावा कंपनीने त्यावेळी केला होता. मात्र, तसे न करता रोख्यांच्या विक्रीतून आलेला पैसा कंपनीने आपल्या भारतातील मूळ कंपनीत पाठवला होता.

सहा बनावट कंपन्यांत पैसे वळवले
मूळ कंपनीने सॉफ्टवेअरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे सांगत ते पैसे सहा बनावट कंपन्यांत वळवले व तेथून ते पैसे वैयक्तिक खात्यात वळवत या मालमत्तांची खरेदी केली. 
या प्रकरणी ईडीने यापूर्वी कंपनीचे संचालक प्रशांत मुळेकर, पंकज श्रीवास्तव, किरण कुलकर्णी आणि कंपनीचा कर सल्लागार दिनेश जाजोडिया याला अटक केली  होती.
 

Web Title: 26 flats, shops of 'Chandamama' owners seized; ED action, 40 crores worth of assets seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.