Join us

राज्यात २६ हजार ६७२ रुग्ण, तर ५९४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णांची संख्या सातत्याने ३० हजारांच्या खाली नोंद होते आहे. राज्यात दिवसभरात २६ हजार ६७२ रुग्ण ...

मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णांची संख्या सातत्याने ३० हजारांच्या खाली नोंद होते आहे. राज्यात दिवसभरात २६ हजार ६७२ रुग्ण आणि ५९४ मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५५ लाख ७९ हजार ८९७ झाली असून, मृतांचा आकडा ८८ हजार ६२० झाला आहे. सध्या ४८ लाख ३९५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात रविवारी २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५१ लाख ४० हजार २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२ टक्के झाले असून, मृत्यूदर १.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३० लाख १३ हजार ५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात २६ लाख ९६ हजार ३०६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर २१ हजार ७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

दिवसभरात नोंद केलेल्या ५९४ मृत्यूपैकी ३९८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १९६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ५९४ मृत्यूमध्ये मुंबई ४९, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा १, मीरा भाईंदर मनपा १४, पालघर ९, वसई विरार मनपा २, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ७, नाशिक मनपा १२, अहमदनगर ३९, अहमदनगर मनपा ८, जळगाव ८, नंदूरबार ३, पुणे ८४, पुणे मनपा ९, सोलापूर ४३, सोलापूर मनपा २, सातारा २०, कोल्हापूर १९, कोल्हापूर मनपा ४, सांगली ३२, सांगली मिरज कुपवाड मनपा ७, सिंधुदुर्ग ११, रत्नागिरी १३, औरंगाबाद १२, औरंगाबाद मनपा ९, जालना ४, हिंगोली १, परभणी ४, परभणी मनपा ३, लातूर ४, लातूर मनपा १, उस्मानाबाद ७, बीड २८, नांदेड ५, अकोला १०, अकोला मनपा ५, अमरावती १५, अमरावती मनपा ३, यवतमाळ ६, वाशिम ६, नागपूर ३, नागपूर मनपा ९, वर्धा १३, भंडारा ५, गोंदिया ४, चंद्रपूर ६, चंद्रपूर मनपा ३, गडचिरोली २० इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.