260 ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी पुन्हा समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:48 AM2022-01-21T10:48:18+5:302022-01-21T10:49:41+5:30

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छीमारांचा मोठा सहभाग

260 Olive Ridley, Green Sea again at sea | 260 ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी पुन्हा समुद्रात

260 ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी पुन्हा समुद्रात

googlenewsNext

मुंबई : सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा, लांजा मासा, ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या. त्यांना मच्छीमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. मात्र त्यावेळी झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४०.७८ लाख रुपयांची नुकसानभरपाईही दिली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करत असलेले काम कौतुकास्पद असून अशाच प्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणुकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मागील १५ दिवसांत अशा ३८ प्रकरणांत ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवन कक्षाकडून देण्यात आली आहे, ज्यामध्ये २६ ऑलिव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलिया यांना मच्छीमारांनी सुखरूप समुद्रात सोडले. या वर्षात अशा प्रकारे ८६ प्रकरणांत मच्छीमारांना ११.५२ लाख रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे.

आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश), एक गादा (हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलिया (फिनलेस पोर्पोईस) अशा २६० दुर्मीळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

कांदळवनात वाढ - आदित्य ठाकरे
एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.किमीची वाढ झाली आहे. विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: 260 Olive Ridley, Green Sea again at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.