मुंबई : येत्या तीन महिन्यांत मुंबईवर २६/११च्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे इनपुट राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) पोलिसांना दिले असून, मुंबईत शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी महत्त्वाची ठिकाणे, रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढवला आहे. एसआयडीच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) आठ ते दहा आत्मघातकी अतिरेकी समुद्रमार्गे शहरात शिरून विध्वंस घडवतील. त्यांनी समुद्रमार्गे हल्ल्यांसाठी एक मॉड्यूल तयार केले आहे. त्याचे नाव ‘आईस क्यूब’ असे असून, त्याचा प्रमुख अबू याकूब आहे. ही माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्तालयाने शहरातील १७ रेल्वे पोलीस ठाण्यांना सूचनावली जारी केली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाशी समन्वय साधून प्रत्येक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर बंदोबस्त वाढवावा, संशयास्पद हालचाली, प्रवाशांवर नजर ठेवून तिथल्या तिथे शहानिशा करावी.
पुन्हा २६/११ सारखा हल्ला ?
By admin | Published: April 15, 2015 2:16 AM