Join us

...अन् मोशे भावुक झाला!, २६/११ हल्ल्याचा साक्षीदार; १० वर्षांनी मायदेशी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:13 AM

२६/११ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील नरिमन हाउसच्या छाबड सेंटरवर केलेल्या भीषण हल्ल्यातून बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल १० वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर खूपच भावुक झाला

मुंबई : २६/११ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील नरिमन हाउसच्या छाबड सेंटरवर केलेल्या भीषण हल्ल्यातून बचावलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल १० वर्षांनी मुंबईत परतल्यानंतर खूपच भावुक झाला. मायदेशी परतल्याचा आनंद त्याच्या चेहºयावर जाणवत होता.दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावल्यानंतर मोशे त्याच्या आजी-आजोबांसोबत इस्रायलमधील अफुला शहरात राहत आहे. तो मंगळवारी मुंबई विमानतळावर पोहोचला. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौºयावर असताना त्यांनी मोशेची भेट घेतली होती. तसेच देशात सुरक्षित वातावरण असून पंतप्रधानांनी मोशेला भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्या वेळी मुंबईत राहून शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा मोशेने व्यक्त केली होती.‘आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा असून मोशे मुंबईत परत येऊ शकला यासाठी मी देवाचे आभार मानतो. मुंबई हे आता खूपच सुरक्षित शहर आहे,’ अशी प्रतिक्रिया विमानतळावर पोहोचलेले मोशेचे आजोबा रब्बी रोझिनबर्ग यांनी व्यक्त केली. नरिमन हाउसचे व्यवस्थापक रबई कोझ्लोव्हस्की म्हणाले की, मोशे आता बारा वर्षांचा झाला आहे. त्याच्या आई-वडिलांनी शेवटचे क्षण घालवलेल्या छाबड सेंटरमध्ये तो राहणार आहे.

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्ला