26/11 Mumbai Attack : 'कसाब अन् बुधवार'चं कनेक्शन, तपास अधिकाऱ्यांनी सांगितला योगायोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:09 PM2018-11-26T13:09:38+5:302018-11-26T13:14:00+5:30
दहशतवादी कसाबने 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला केला होता.
मुंबई - 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि बुधवार या योगायोगाबद्दल 26/11 हल्ल्याचे प्रमुख तपास अधिकारी रमेश महाले यांनी त्यांच्या '26/11 कसाब आणि मी' या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यामध्ये सांगताना, माझा परेश्वरावर विश्वास असला तरीही मी अंधश्रद्ध नाही. त्यामुळे अमुक दिवशी असं घडत अन् अमुक वारी तसं घडतं यावर माझा विश्वास नाही, असे सांगत त्यांनी बुधवार अन् कसाबचा किस्सा उलगडला आहे.
दहशतवादी कसाबने 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला केला होता. या घटनेला आज 26 नोव्हेंबर 2012 रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, कसाब आणि बुधवार हे जणू योगायोगाचं एक समीकरण बनल्याचे तपास अधिकार रमेश महाले यांनी तारखेनुसार स्पष्ट केलं आहे. कारण, ज्या दिवशी कसाबने हल्ला केला होता 26 नोव्हेंबर बुधवार अन् ज्या दिवशी कसाबला फाशी देण्यात आली तोही वार बुधवारच होता.
बुधवार अन् कसाब
26 नोव्हेंबर 2008 बुधवार - कसाबचा मुंबईत प्रवेश
18 फेब्रुवारी 2009 बुधवार - कसाबने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यापुढे कबुली देण्याची जबाबदारी दाखवली.
25 फेब्रवारी 2009 बुधवार - अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दोषारोपपत्र दाखल
15 एप्रिल 2009 बुधवार - कारागृहात उभारण्यात आलेल्या न्यायालयात प्रथम हजर करण्यात आलं.
6 मे 2009 बुधवार - कसाबवर न्यायालयानं दोषारोपपत्र दाखल केलं.
25 जुलै 2009 बुधवार - कसाबचा कबुली जबाब ग्राह्य न धरता न्यायालयान निर्णय राखून ठेवला.
25 नोव्हेंबर 2009 बुधवार - कसाबने केलेले विषप्रयोगाचे आरोप न्यायालयाने फेटाळले.
16 डिसेंबर 2009 बुधवार - सरकारी पक्षाने साक्षी नोंदवण्याचं काम झाल्याचं न्यायालयात सांगितलं.
31 मार्च 2010 बुधवार - कसाबविरुद्ध निकाल जाहीर करण्याचा दिवस न्यायालयानं जाहीर केला.
29 ऑगस्ट 2012 बुधवार - सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेविरुद्धचं कसाबचं अपील फेटाळलं.
21 नोव्हेंबर 2012 - येरवडा कारागृहात कसाबला फासावर लटकवण्यात आलं.