Join us

दोन दिवसांत २६८ जणांचे परवाने निलंबित

By admin | Published: January 08, 2016 2:43 AM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली आहे.

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली आहे. या धडक मोहिमेत आतापर्यंत दोन दिवसांत २६८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. मात्र कारवाई करूनही काही फरक पडत नसल्याने धडक मोहीम राबवण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. ६ जानेवारीपासून या मोहिमेत वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली. गेल्या दोन दिवसांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६0, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्या २७, क्षमतेपेक्षा जास्त भाराचा माल वाहून नेणाऱ्या ८५, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या ६४, विना हेल्मेट २२३, वेगाने वाहन चालवणाऱ्या २ आणि सिग्नलचे नियम तोडणाऱ्या १८३ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एस. सहस्रबुद्धे यांनी दिली. तर ४ लाख ८१ हजार ४७0 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.