गेटवे आॅफ इंडिया येथे २६ वा एलिफंटा महोत्सव

By Admin | Published: October 15, 2015 01:52 AM2015-10-15T01:52:07+5:302015-10-15T01:54:20+5:30

महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा २६वा एलिफंटा महोत्सव ३१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१५ ला साजरा होणार आहे.

26th Elephanta Festival at Gateway of India | गेटवे आॅफ इंडिया येथे २६ वा एलिफंटा महोत्सव

गेटवे आॅफ इंडिया येथे २६ वा एलिफंटा महोत्सव

googlenewsNext

उरण : महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा २६वा एलिफंटा महोत्सव ३१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१५ ला साजरा होणार आहे. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून बेटावर महोत्सव साजरा करण्याला फाटा देत मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथे महोत्सव साजरा करण्यास सुरु वात करण्याची योजना महाराष्ट्र पर्यटन विभागाने आखली आहे. मराठमोळ्या लोककलेबरोबरच विविध राज्यातील सांस्कृतिक कला, नृत्य, गायन कलाकार सादर करणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विभागाने १९८९ सालापासून एलिफंटा महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दोन-तीन वर्षांचा अपवाद वगळता एलिफंटा बेटावर दरवर्षी महोत्सव साजरा केला जातो. ३१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१५ असे दोन दिवस साजरा होणारा महोत्सव राज्याचे मुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन आणि गृहराज्य मंत्री राम श्ािंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला
आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरु वात मराठमोळ्या पध्दतीने तुतारी आणि संबळ वादन करून व्यावसायिक कलाकार करणार आहेत. त्याशिवाय मराठमोळे कलाकार शिवरायांना मानाचा मुजरा देऊन शिवराज्याभिषेक, शिवगर्जना, पारंपरिक ढोलकी वादन, गोंधळ नृत्य, नाशिक ढोल, भगवा जागर, मशाल नृत्य आणि लोककला रंगमंचावर सादर करणार आहेत. विद्या देशपांडे अ‍ॅण्ड ग्रुपकडूनही क्लासिकल डान्स परफॉर्मन्स सादर केले जाणार आहेत.
३१ आॅक्टोबरला सायंकाळी फोल्क सिंगर कैलाश खेर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे, त्याच बरोबर क्लासिकल, भरतनाट्यम, कथ्थक, कथकली,कुचीपुडी, ओडिसी आदी नृत्यही सादर करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आदी विविध राज्यातील पारंपरिक लोककला व्यावसायिक कलाकार सादर करणार आहेत.
प्लेबॅक सिंगर म्हणून ओळख असलेला जावेद अली यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. एलिफंटा बेटावर मात्र दिवसा पेंटिंग, शिल्पकृती, हेरिटेज वॉक बाय एक्सपर्ट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: 26th Elephanta Festival at Gateway of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.