Join us

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी 28 अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 9:31 PM

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. 

मुंबई उपनगर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी आज छाननीअंती 28 अर्ज वैध ठरले, तर पाच अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी (कंसात पक्षाचे नाव) : राजेश रामकिसन मल्लाह (बहुजन समाज पार्टी), बाळा वेंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी पीपल्स), समीर बबन मोरे (अपक्ष), रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेना), सुनील भिमा चव्हाण (अपक्ष), हरिशंकर यादव (समाजविकास क्रांती पार्टी), मनीषा रवींद्र वायकर (अपक्ष), ॲड. मितेश वार्ष्णेय (भीम सेना, अपक्ष), कपिल सोनी (अपक्ष), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टी), संजीवकुमार अप्पाराव कालकोरी (अपक्ष), संतोष माणिक रायबान (अपक्ष), श्रावण राजाराम इंगळे (अपक्ष), गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्ष), ह्रदा धनंजय शिंदे (अपक्ष), सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टी), सुषमा दयानंद मेहता (बहुजन मुक्ती पार्टी), परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडी), लता पांडुरंग शिंदे (अपक्ष), अमोल गजानन किर्तीकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), सुरिंदर मोहन अरोरा (भारत जन आधार पार्टी), भरत खिमजी शाह (हिंदू समाज पार्टी), रोहन साटोने (अपक्ष). अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी (कंसात पक्ष) : आफताब मशवूद खान (अपक्ष), नेहाल सय्यद (अपक्ष), अब्दुल वसीम अब्दुल हकीम शेख (अपक्ष), सुप्रिया अमोल किर्तीकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रभाकर साधू (मिशन ऑल इंडिया इंडिपेन्डन्ट जस्टीस पार्टी). उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 6 मे 2024 अशी आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४लोकसभानिवडणूक