वरळीतून बनावट एन-९५ मास्कचा २७ लाखांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:44 AM2020-08-22T02:44:52+5:302020-08-22T02:44:55+5:30

न्यायालयाने त्याला २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे.

27 lakh stocks of fake N-95 masks seized from Worli | वरळीतून बनावट एन-९५ मास्कचा २७ लाखांचा साठा जप्त

वरळीतून बनावट एन-९५ मास्कचा २७ लाखांचा साठा जप्त

googlenewsNext

मुंबई : आॅनलाईन ओळख झालेल्या ठगांकड़ून कमिशनवर मुंबईत विक्रीसाठी आणलेल्या २७ लाख किंमतीच्या १८ हजार एन- ९५ मास्क चा बनावट साठा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. याप्रकरणी रियाज खान (३६) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे. .
वरळी येथील सासमीरा रोड परिसरात एक जण बनावट एन मास्क ९५ चा साठा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला मिळाली. यावेळी प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नितीन पाटील, गजानन भारती, मोहसिन पठाण, राहुल अनभुले आणि चालक गोंडसे यांनी गुरूवारी सापळा रचला आणि खानला ताब्यात घेतले. त्याच्या टेम्पोतून २७ लाख किंमतीच्या १८ हजार एन मास्क ९५ चा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. खान हा शिवाजी नगर येथील रहिवासी आहे.
>दिल्ली कनेक्शन
सोशल मिडियावर खान हा बनावट मास्कची विक्री करणाऱ्याच्या संपर्कात आला. त्यानुसार त्यांच्याकडून कमीशनवर मास्क घेत तोे मुंबईत विक्रीसाठी आणला होता. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.

Web Title: 27 lakh stocks of fake N-95 masks seized from Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.