मुंबई - भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जख्मी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जखमी झाले आहेत.
वर्ष | मृतांची संख्या | जखमींची संख्या |
2013 (531 इमारती कोसळल्या) | 101 | 183 |
2014 ( 343 इमारती कोसळल्या) | 21 | 100 |
2015 (417 इमारती कोसळल्या) | 15 | 120 |
2016 (486 इमारती कोसळल्या) | 24 | 171 |
2017 (568 इमारती कोसळल्या) | 66 | 165 |
2018 जुलैपर्यंत (359 इमारती कोसळल्या) | 7 | 100 |
गेल्या 5 वर्षात जितक्या लोकांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाला नाही त्यापेक्षा अधिक मृत्यू इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत गेले असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला.