मुंबईत तब्ब्ल २७०४ इमारती कोसळल्या; २३४ लोकांचा मृत्यू तर ८४० जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:02 PM2019-07-16T14:02:08+5:302019-07-16T14:06:56+5:30

मुंबईत जीर्ण झालेल्या ४९९ इमारती असून त्या पडल्याशिवाय पर्याय नसल्याचे शकील यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

2704 buildings collapsed in Mumbai; 234 people died or 840 injured | मुंबईत तब्ब्ल २७०४ इमारती कोसळल्या; २३४ लोकांचा मृत्यू तर ८४० जखमी 

मुंबईत तब्ब्ल २७०४ इमारती कोसळल्या; २३४ लोकांचा मृत्यू तर ८४० जखमी 

Next
ठळक मुद्देगेल्या साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांची बळी गेला आहे तर ८४० लोकं जखमी गेल्या पाच वर्षांत जितक्या लोकांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाला असेल त्यापेक्षा जास्त निष्पाप जीवांचा मृत्यू इमारती कोसळून झाला आहे.

मुंबई -  भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, गेल्या साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांची बळी गेला आहे तर ८४० लोकं जखमी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना  बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे. तसेच मुंबईत जीर्ण झालेल्या ४९९ इमारती असून त्या पडल्याशिवाय पर्याय नसल्याचे शकील यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला २०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे. तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती मागितली होती. या माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जन संपर्क माहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांना  माहिती अधिकार अधिनियम- २००५ अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन २०१३ पासून जुलै २०१८ पर्यंत एकूण मुंबईत इमारती कोसळून तब्बल २३४ लोकांची मृत्यू झाला आहे तर ८४० जण जखमी झाले आहेत.

वर्षनिहाय दुर्घटना 

२०१३ मध्ये एकूण ५३१ कोसळण्याची दुर्घटनेत एकूण १०१ लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचे समावेश आहे. एकूण १८३ लोक जखमी झाले असून त्यात ११० पुरुष आणि ७३ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१४ मध्ये एकूण ३४३ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण २१ लोकांची  मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचे समावेश आहे आणि एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ६२ पुरुष आणि ३८ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१५ मध्ये एकूण ४१७ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण १५ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ११ पुरुष आणि ४ स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण १२० लोक जखमी झाले असून त्यात ७९ पुरुष आणि ४१ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१६ मध्ये एकूण ४८६ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण २४ लोकांची  मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ७ स्त्रियांचे समावेश आहे. एकूण १७१ लोक जखमी झाले असून त्यात ११३ पुरुष आणि ५९ स्त्रियांचे समावेश आहे.  तसेच २०१७ मध्ये एकूण ५६८ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण ६६ लोकांची  मृत्यू झाला असून त्यात ४४ पुरुष आणि २२ स्त्रियांचे समावेश आहे. त्याचप्रमाणे एकूण १६५ लोक जखमी झाले असून त्यात १०१ पुरुष आणि ६४ स्त्रियांचे समावेश आहे. तसेच २०१८ जुलैपर्यंत एकूण ३५९ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण ७ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ५ पुरुष आणि २ स्त्रियांचे समावेश आहे. एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ७३ पुरुष आणि २७ स्त्रियांचे समावेश आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत जितक्या लोकांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाला असेल त्यापेक्षा जास्त निष्पाप जीवांचा मृत्यू इमारती कोसळून झाला आहे. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटनेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. 

Web Title: 2704 buildings collapsed in Mumbai; 234 people died or 840 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.