राज्यात काेराेनाचे नवे २,७६८ रुग्ण; २५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:03+5:302021-02-07T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शनिवारी २,७६८ नवीन रुग्णांचे निदान आणि २५ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात १,७३९ रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शनिवारी २,७६८ नवीन रुग्णांचे निदान आणि २५ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात १,७३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १९,५३,९२६ बाधित कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७२ टक्के झाले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ९३४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २०,४१,३९८ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार २८० आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण २५ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात नोंद झालेल्या २५ मृत्यूंमध्ये मुंबई ४, जळगाव १, नंदूरबार ३, पुणे मनपा ९, पिंपरी-चिंचवड मनपा १, जालना १, लातूर मनपा ३, अमरावती २, अमरावती मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४९,२८,१३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४१,३९८ (१३.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७३,५०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये, तर १,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
..................