Join us

ठाण्याच्या कुटुंबाच्या भरपाईला अपिलात २८ लाखांची कात्री

By admin | Published: September 13, 2015 2:23 AM

पुणे-सातारा रस्त्यावर १९ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झालेले ठाण्यातील एक उद्योजक दिलीप मधुकर चुनेकर यांच्या कुटुंबियांना तेथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने मंजूर

मुंबई : पुणे-सातारा रस्त्यावर १९ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झालेले ठाण्यातील एक उद्योजक दिलीप मधुकर चुनेकर यांच्या कुटुंबियांना तेथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने मंजूर केलेल्या भरपाईच्या रकमेत उच्च न्यायालयाने अपिलात २२ लाख रुपयांची कपात केली आहे.चुनेकर यांच्या पत्नी मंजरी, मुलगी क्षितिजा आणि पुण्यात राहणारी आई सुशिला यांनी केलेला दावा मंजूर करून न्यायाधिकरणाने दोन वर्षांपूर्वी ८८ लाख ४६ हजार रुपयांची भरपाई मंजूर केली होती. मात्र याविरुद्ध न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या विमा कंपनीने केलेले अपील मंजूर करून उच्च न्यायालयात न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने याऐवजी ६० लाख ४१ हजार ६०४ रुपये भरपाई मंजूर केली.तसेच न्यायाधिकरणाने भरपाईच्या रकमेवर १२ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने व्याजाचा दरही १२ ऐवजी नऊ टक्के केला. हे व्याज चुनेकर कुटुंबाने दावा दाखल केला तेव्हापासून म्हणजे १९९६ पासून मिळेल.न्यायाधिकरणाने ८८.४६ लाख रुपयांपैकी ५० लाख रुपये मंजरी यांना, ३० लाख रुपये क्षितिजा यांना तर ८.४६ लाख रुपये सुशिला यांना मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने हे वाटपाचे प्रमाणही काहीसे बदलले. आता मंजरी यांना ६० टक्के, क्षितिजा यांना २५ टक्के व सुशिला यांना १५ टक्के रक्कम मिळेल. यानुसार कोणाच्या वाट्याला नेमकी किती रक्कम येते व ती कशाप्रकारे कुठे गुंतवायची याविषयीचा आदेश न्यायाधिकरणाने द्यावा, असे उच्च न्यायालयाने सांगितले.दि. ३० मार्च १९९६ रोजी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवल येथे झालेल्या अपघातात दिलीप चुनेकर यांचा व त्यांची वहिनी मधुरा यांचा मृत्यू झाला होता. चुनेकर, त्यांचे बंधू सतीश, वहिनी मधुरा, मेव्हणा अनिल आणि मामेभाऊ सुरेश आठल्ये त्या दिवशी मोटाीरने जात होते. दिलीप चुनेकर मोटार चालवीत होते. शिवरल येथे वाहनांची कोंडी झाली होती. चुनेकर यांनी आपली मोटार कोंडीत अडकलेल्या एका ट्रकच्या मागे नेऊन उभी केली. मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने धटक दिल्याने चुनेकर यांची मोटार दोन ट्रकच्या मध्ये चेपली गेली.ज्या ट्रकने धडक दिली तो कराड येथील शहाजी हिंदुराव मुळिक यांच्या मालकीचा होता. त्याचा विमा न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीने उतरविलेला होता. मुळिक यांनी दावा लढविला नाही म्हणून विमा कंपनीने लढविला. (विशेष प्रतिनिधी)अपिलातील तीन मुद्देअपघात ट्रकचालकाच्या निष्काळजी व बेफाम गाडी चालविण्यामुळेच झाला. यास अपघातात जखमी झालेले सतीश यांची साक्ष पूरक ठरली. शिवाय याबद्दल ट्रकचालकास शिक्षाही झाली होती.चुनेकर यांच्या ज्या इन्कम टॅक्स रिटर्नवरून त्यांचे उत्पन्न गृहित धरले तो त्यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी फाईल झालेला असल्याने अमान्य करावा, हे विमा कंपनीचे म्हणणे अमान्य. यासाठी आयकर अधिकारी व चार्टर्ड अकाऊंटन्टची साक्ष.मृत्यूच्या वेळी चुनेकर यांचे वार्षिक उत्पन्न ३.७४ लाख रु. त्यात आतापर्यंत ५० टक्के वाढ गृहित धरून उत्पन्न ५.६२ लाख रु. यातून ३० टक्के वैयक्तिक खर्चाची वजावट. मृत्यूच्या वेळचे वय ४४ वर्षे. त्यापुढे १४ वर्षे आयुष्य गृहित धरून भरर्पा ५७.९१ लाख रु.