पाच वर्षांत २८ लाख युनिट्स रक्त वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:30 AM2017-12-25T04:30:19+5:302017-12-25T04:30:22+5:30
रक्तसाठा उपलब्ध असूनही रक्तदात्यापर्यंत माहिती न पोहोचणे, रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती रक्तपेढ्यांकडे नसणे, अशा एक ना अनेक त्रुटींवर उपाययोजना करीत, राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना कठोर निर्देश दिले आहेत
मुंबई : रक्तसाठा उपलब्ध असूनही रक्तदात्यापर्यंत माहिती न पोहोचणे, रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती रक्तपेढ्यांकडे नसणे, अशा एक ना अनेक त्रुटींवर उपाययोजना करीत, राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना कठोर निर्देश दिले आहेत. मात्र, असे असले, तरी गेल्या पाच वर्षांत देशात २८ लाख युनिट्स वाया गेल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात दरवर्षी ३० लाख युनिट रक्ताची गरज असते, पण तेवढे रक्त जमा होत नसल्याची चिंता विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. देशभरात प्रसूती, अपघात, तसेच इतर अनेक कारणांमध्ये रक्त, प्लाज्मा, प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण प्रचंड मोठे आहे. रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत नसल्याने रक्ताचा तुटवडा दरवर्षी भासत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना गरजेनुसार रक्त उपलब्ध होत नाही.
रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तासाठी एका रक्तपेढीतून दुसºया रक्तपेढीसाठी पाय झिजवावे लागतात. गरजू व्यक्तीला रक्त मिळावे, या दृष्टीकोनातून रक्तदान करणाºयांची संख्याही काही कमी नाही. देशभरातील अनेक रक्तदाते रक्तदान शिबिरात जातात, पण रक्तदानानंतर निर्माण झालेले रक्त साठविण्याची यंत्रणा अपुरी असल्यामुळे लाखो लीटर रक्त कोणत्याही वापराविना फेकून द्यावे लागत आहे.
वर्ष रक्त युनिट संपूर्ण रक्तपेशी प्लेटलेट प्लाज्मा एकूण
२०१४-१५ २०९,३७८ १३२,२११ ३८८,०५५ २८९,४५१ १,०१९,०९५
२०१५-१६ २१२,६८९ १९५,२३० ४८८,१५५ ३८१,५८४ १,२७७,६५८
२०१६-१७ १५०,५६७ १७४,८४८ ५२४,३७८ ३३२,०६१ १,१८१,८५४