Join us

मुंबईत २८ हजार ८६ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत सोमवारी १ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ...

मुंबई : मुंबईत सोमवारी १ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३४ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या २८ हजार ८६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिवसभरात १ हजार ५७ रुग्ण आणि ४८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ९८ हजार ८६७ झाली असून मृतांचा आकडा १४ हजार ६७१ झाला आहे. मुंबईत १७ ते २३ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२० टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात दिवसभरात २१ हजार ९४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ६० लाख ९३ हजार ९४७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ४४ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २०८ इतकी आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १३ हजार १२१ सहवासितांचा शोध घेतला आहे.