मुंबई : मुंबईत सध्या २८ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात १ हजार ४७० रुग्ण बरे झाले असून, ६ लाख ५२ हजार ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के झाला आहे.
१६ ते २२ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२० टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २४६ दिवसांवर आला आहे. मुंबईत रविवारी १ हजार ४३१ रुग्णांचे निदान झाले असून, ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ६ लाख ९७ हजार ८१० झाली असून, बळींचा आकडा १४ हजार ६२३ झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन ५३ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २१९ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १३ हजार ८२८ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.