सुविधांअभावी २८३ विद्यार्थिनींनी सोडले शिक्षण ! माहूर तालुक्यातील भयानक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 07:00 AM2018-07-10T07:00:24+5:302018-07-10T07:00:43+5:30

मुलींना शाळेचे दार सावित्रीबाई फुले यांनी उघडले़ आता मुलींचे शाळेतील प्रमाण वाढावे यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे.

 283 students leave education due to lack of facilities! The terrible reality of the Mahur taluka | सुविधांअभावी २८३ विद्यार्थिनींनी सोडले शिक्षण ! माहूर तालुक्यातील भयानक वास्तव

सुविधांअभावी २८३ विद्यार्थिनींनी सोडले शिक्षण ! माहूर तालुक्यातील भयानक वास्तव

googlenewsNext

 - इलियास बावाणी 
माहूर (जि. नांदेड)  - मुलींना शाळेचे दार सावित्रीबाई फुले यांनी उघडले़ आता मुलींचे शाळेतील प्रमाण वाढावे यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केवळ सुविधा मिळत नाहीत म्हणून माहूर तालुक्यातील २८३ विद्यार्थिनींनी बारावीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत शिक्षणावर पाणी सोडल्याचे भयानक वास्तव गटशिक्षणाधिकाºयांच्या एका अहवालातून पुढे आले आहे.
गटशिक्षणाधिकाºयांनी तालुक्यातील १४ गावांतील पहिली ते बारावीपर्यंतच्या १९ शाळा-महाविद्यालयांची पाहणी करुन हा अहवाल तयार केला आहे. या गावांमध्ये १२वीपर्यंतच शिक्षणाची व्यवस्था असून पुढील शिक्षणासाठी माहूरला जावे लागते. या सर्व शाळा-महाविद्यालयांत गेल्या शैक्षणिक वर्षांत एकूण ७ हजार ३३३ विद्यार्थी शिक्षण घेत होते़ यामध्ये मुले ३ हजार ८०८ तर मुली ३ हजार ५२५ होत्या़ चालू शैक्षणिक वर्षाचा (२०१८-१९) आढावा घेतल्यास तब्बल २८३ मुलींनी शिक्षण सोडले असल्याचे हा अहवाल सांगतो. पाायाभूत असुविधा, रस्त्यांची दुरावस्था, वाहनांची गैरसोय आदी कारणांमुळे ही संख्या घटल्याचे माहूरचे गटशिक्षण अधिकारी एम़ए़ खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिक्षण सोडण्याची कारणे काय?
रस्ते नाहीत
बस उपलब्ध नाही
माहूरला येण्यासाठी कुठल्याच वाहनांची व्यवस्था नसल्याने पायी येणे हाच पर्याय
या शाळा-महाविद्यालयांची केली पाहणी
शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा, सावित्रीबाई फुले वि. अंजनखेड, पंचशील विद्यालय लखमापूर, कै. पार्वतीबाई वि. वाई बाजार, वसंतराव नाईक वि. वाई बाजार, के.जी.एन.वि. वाई बाजार, हाजी अख्तर वि. वाई बाजार, रत्नीबाई प्राथ. इंग्लिश स्कूल वाई बाजार, सुभाष वि. गोकुळनगर, शासकीय आश्रमशाळा तुळशी, छत्रपती संभाजी वि. मदनापूर, कै. दीपला नाईक वि. पालाईगुडा, वसंतराव नाईक वि. शेख सिंदखेड, वसंतराव नाईक वि. वानोळा, गोविंदराव पाटील वि. शेख फरिद वझरा, कै. देवराव पाटील वि. अनंतवाडी, वसंतराव नाईक वि. अनमाळ, राष्ट्रमाता गुरूकुल हडसनी नवी, माध्यमिक वि. तुळशी परिसर या शाळा-महाविद्यालयांची पाहणी करुन गटशिक्षणाधिकाºयांनी हा अहवाल तयार केला आहे.
लवकरच उपाययोजना करण्यात येणार
तालुक्यातील सर्व खाजगी विद्यालयांना, स्वत:चे वाहन घेण्याबाबत, मुलींच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यासाठी लेखी सूचना देण्यात येणार आहे. मानव विकास मिशनअंतर्गत माहूर तालुक्याला एसटी बस उपलब्ध नसल्याने वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे - एम़ए़ खान, गटशिक्षणाधिकारी, पं़स़ माहूऱ
पटसंख्येअभावी सहा शाळा बंद
माहूर तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण १७१ शाळा आहेत. यातील ४ शाळा आठवीपर्यंत पोहोचल्या आहेत. पटसंख्या नसल्याने मंदिनानगर, टाकळी जुनी, नेर, जमला नाईक तांडा, बोंडगव्हाण जुने, नवीन वझरा येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
जि.प.उपाध्यक्ष माहूरचेच!
विशेष म्हणजे, नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष समाधान जाधव माहूर तालुक्यातीलच आहेत.
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तुलनात्मक आढावा
मुले मुली
वर्ग पहिला ३८ ३६
वर्ग दुसरा २८ २६
तिसरी २१ ३३
चौथी ३३ ३३
पाचवी २५० २४३
सहावी ३३५ ३२४
सातवी ४०२ ३५६
आठवी ६१६ ६२४
नववी ६६३ ६५२
दहावी ६४५ ५६९
अकरावी ४१५ ३५१
बारावी ३६२ २७८
एकूण ३८०८ ३५२५
(सरासरी २८३ मुलींची संख्या घटली)

Web Title:  283 students leave education due to lack of facilities! The terrible reality of the Mahur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.