Join us

२९ लाखांची सोन्याची बिस्किटे विमानतळावर जप्त

By admin | Published: January 12, 2017 4:26 AM

मुंबईत विमानातून २९ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे कस्टम विभागाने

मुंबई : रियाधहून मुंबई विमानतळावर आलेल्या जेट एअरवेजच्या विमानातून २९ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत हस्तगत करण्यात आली आहे. बिस्किटांप्रकरणी मोहम्मद अल्ताफ मोईदिनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोईदिन हा भारतीय नागरिक आहे. सौदी अरेबियातील रियाधहून आलेले जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरले. मुंबईमार्गे हे विमान मंगळुरूला जाणार होते. त्यापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मदकडे ११६० ग्रॅम वजनाची  दहा सोन्याची बिस्किटे आढळून आली. दहा सोन्याच्या बिस्किटांची किंमत २९ लाख ६८ हजार ५८५ रुपये असल्याची माहिती आहे. त्याने एलईडी लाइटमध्ये ४ सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती.  अन्य बिस्किटांना काळी पट्टी चिकटविण्यात आली होती. यामागील मुुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. तो ही बिस्किटे कोणाला व किती रुपयांमध्ये देणार होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली. (प्रतिनिधी)