अग्निसुरक्षेशी खेळणाऱ्या ५९ इमारती, आस्थापनांवर खटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:32 AM2020-01-04T01:32:02+5:302020-01-04T01:32:08+5:30

अग्निशमन दलाची कारवाई; ६२८२ आस्थापनांवर बडगा

29 lawsuits against fireplaces, establishments | अग्निसुरक्षेशी खेळणाऱ्या ५९ इमारती, आस्थापनांवर खटले

अग्निसुरक्षेशी खेळणाऱ्या ५९ इमारती, आस्थापनांवर खटले

Next

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईत आगीचे प्रमाण वाढले असल्याने महापालिकेने आपली कारवाई तीव्र केली आहे. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाºया तब्बल ६२८२ आस्थापनांवर गेल्या वर्षभरात अग्निशमन दलामार्फत कारवाई करण्यात आली आहे. तर २०१५ पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत पालिकेच्या नोटिसांना न जुमानता आपली मनमानी सुरूच ठेवणाºया ५९ इमारती, आस्थापनांच्या मालकांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

कमला मिल कंपाउंड येथील दोन रेस्टोपबला २९ डिसेंबर २०१७ रोजी लागलेल्या आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला होता. अशा अनेक मोठ्या आगीच्या घटना गेल्या तीन वर्षांत घडल्या आहेत. अग्निशमन दलामार्फत हॉटेल्स, मॉल्स, आस्थापना, इमारती यांची झाडाझडती घेतली जाते. कमला मिल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई मुंबईभर घेण्यात आली होती. गेल्या वर्षभरात अग्निसुरक्षा, आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाºया सहा हजार २८२ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. तर २०८ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान नऊ हजार ९२१ सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत.

स्थायी समितीने याबाबत अग्निशमन दलाकडून अहवाल मागविला होता. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. गेट वे आॅफ इंडियातील गार्डन हाउस या हॉटेलमधील तळमजल्याला अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र आहे. मात्र, पहिल्या ते पाचव्या मजल्यापर्यंत अग्निसुरक्षा असूनही अग्निसुरक्षेचे ना हरकत प्रमाणपत्र मात्र नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना आरोग्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कळवण्यात आले आहे. १ ते ५ मजले अनधिकृत असल्यामुळे एमआरटीपी कायद्याने कारवाई करण्यात येत होती. मात्र, याबाबत न्यायालयात खटला सुरू असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली असल्याचे अग्निशमन दलाने स्थायी समितीला कळवले आहे.

२०१६ ते नोव्हेंबर २०१९ -
५९ इमारती, आस्थापनावर खटले
जानेवारी ते डिसेंबर २०१९
आस्थापना, इमारती
तपासणी - १०८००
कारवाई - ६२८२
नोटीस - २०८
सिलिंडर्स जप्त - ९,९२१

Web Title: 29 lawsuits against fireplaces, establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.