म.रे.वर २९ ठिकाणे धोक्याची
By admin | Published: October 5, 2016 03:32 AM2016-10-05T03:32:07+5:302016-10-05T03:32:07+5:30
उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे ससंदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे ससंदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी रेल्वेकडून अहवाल तयार केला जात असून मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात २९ ठिकाणे धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालात अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही नमूद केल्या आहेत. अहवाल येत्या आठवडाभरात जाईल. सीएसटी ते वाशी आणि सीएसटी ते विठ्ठलवाडी दरम्यान एकूण २९ धोकादायक ठिकाणे असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी एकूण ६८२ लोकांचा मृत्यू झाला असून यातील १३४ जण ठाणे ते कळवा दरम्यान तीन ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत.
सॅन्डहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे वसाहतीत येणारा मार्ग
परळ कार्यशाळेबाहेर
माटुंगा कार्यशाळेबाहेर
शीव ते कुर्ला दरम्यान
विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान
कुर्ला ते विद्याविहार दरम्यान
नाहूर ते मुलुंड दरम्यान नाणेपाड्याजवळ
ठाणे स्थानक कळवा दिशेने
सिडको बस स्थानकाकडून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान
विटावा ते ठाणे स्थानक
कळवा ते खारेगाव येथील रेल्वे फाटक
कळवा ते मुंब्रा दरम्यान
दिवा रेल्वे फाटक
ठाकुर्ली रेल्वे फाटक
कोपर स्थानकाच्या दोन्ही बाजूंना
कल्याण ते शहाड
कल्याण पत्री पूल
विठ्ठलवाडी स्थानक
वडाळा ते जीटीबी नगर मानखुर्द ते वाशी दरम्यान