मुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ४७ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २९ हजार ५२५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीन २९७ दिवसांवर पोहोचला आहे. १३ ते १९ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२३ टक्के असल्याची नोंद आहे.
शहर उपनगरात गुरुवारी १ हजार ४२५ रुग्ण आणि ५९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता मुंबईत एकूण ६ लाख ९३ हजार ६६४ कोरोना बाधित असून १४ हजार ४६८ मृतांचा आकडा आहे. दिवसभरात कोरोनाच्या २९ हजार ३९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ५९ लाख ८६ हजार ३४४ आहेत.
मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ७३ आहेत. तर २७६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १४ हजार ४०५ अतिजोखमीच्या सहवासीतांचा शोध घेतला आहे.