२९५ कासवांना सोडले कर्नाटकातील उद्यानात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:10 AM2018-12-29T04:10:02+5:302018-12-29T04:10:24+5:30

कर्नाटक येथून नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेली २९३ स्टार कासवे जप्त करून आरोपींवर कारवाई करण्यात आली होती.

 295 turtle left Karnataka in the park | २९५ कासवांना सोडले कर्नाटकातील उद्यानात

२९५ कासवांना सोडले कर्नाटकातील उद्यानात

Next

मुंबई : कर्नाटक येथून नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेली २९३ स्टार कासवे जप्त करून आरोपींवर कारवाई करण्यात आली होती. आता या २९३ स्टार कासवांसह अजून दोन कासवांना कर्नाटकातील बनेरगट्टा उद्यानात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पॉज (मुंबई) प्राणी संस्थेने दिली. महसूल गुप्त वार्ता, वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष व वन्यपरिक्षेत्र विभागामार्फत कारवाई करण्यात आली होती.
घरामध्ये वापरासाठी किंवा फेंगशुई म्हणून कासवांचा वापर केला जातो. कासव पाळण्यास बंदी असतानाही गुप्त धनाच्या प्राप्तीसाठी अनेकांकडून छुप्या मार्गाने कासवांचा वापर केला जातो. वाशीतील पाळीव प्राणी विक्री केंद्रचालक तानाजी कलंगे याला विकण्यासाठी आरोपींनी कासवे आणल्याची कबुली दिली होती. मात्र, कलंगे पोलिसांच्या तावडीतून निसटला असून त्याचा शोध सुरू आहे. पॉज (मुंबई) संस्थेचे सचिव सुनीश कुंजू यांनी यासंदर्भात सांगितले की, माहिती प्राप्त झाल्यावर तस्करी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. काही दिवस स्टार कासवांची देखभाल पॉज संस्थेने केली. बुधवारी कर्नाटकातील बनेरगट्टा उद्यानात २९३ स्टार कासवांसह अजून दोन स्टार कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Web Title:  295 turtle left Karnataka in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई