काँग्रेसच्या ३, भाजपाच्या ४ नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:36 AM2018-09-08T03:36:32+5:302018-09-08T03:36:38+5:30

नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले नाही, तर अशा नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

3 of the Congress, four BJP corporators, the hanging sword of cancellation | काँग्रेसच्या ३, भाजपाच्या ४ नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार

काँग्रेसच्या ३, भाजपाच्या ४ नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर जर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले नाही, तर अशा नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ३ आणि भाजपाच्या ४ नगरसेवकांवर टांगती तलवार असून, दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या ५, काँग्रेस १ आणि समाजवादी पार्टीच्या एका नगरसेविकेला गणपती बाप्पा पावणार आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा फटका इतर पालिकांप्रमाणेच मुंबई पालिकेमधील ७ नगरसेवकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालामुळे पालिकेतील काँग्रेसच्या ३ व भाजपाच्या ४ अशा एकूण सात नगरसेवकांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागणार आहे. तर २०१७च्या पालिका निवडणुकीत दुसºया क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या ५, काँग्रेसच्या १ आणि समाजवादी पार्टीच्या १ नगरसेविकेला गणपती बाप्पा पावणार असून, त्यांना पालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १० सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि एन.एस. कर्णिक यांच्या खडपीठासमोर सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका पालिकेतील एकूण नऊ नगरसेवकांना बसला असता.

यांचे नगरसेवकपद
येणार धोक्यात
प्रभाग २८ : राजपती यादव (काँग्रेस)
प्रभाग ३२ : स्टेफी केणी (काँग्रेस)
प्रभाग ६७ : सुधा सिंग (भाजपा)
प्रभाग ७२ : पंकज यादव (भाजपा)
प्रभाग ७६ : केशरीबेन पटेल (भाजपा)
प्रभाग ८१ : मुरजी पटेल (भाजपा)
प्रभाग ९० : ट्युलिप मिरांडा (काँग्रेस)

या सात नगरसेवकांना गणपती बाप्पा पावणार
प्रभाग २८ : एकनाथ हुंडारे (शिवसेना)
प्रभाग ३२ : गीता भंडारी (शिवसेना)
प्रभाग ६७ : प्राची परब (शिवसेना)
प्रभाग ७२ : अनिल माने (शिवसेना)
प्रभाग ७६ : नितीन सलाग्रे (काँग्रेस)
प्रभाग ८१ : संदीप नाईक (शिवसेना)
प्रभाग ९० : बेनीडिट केणी (सपा)

पालिकेतील संख्याबळ
शिवसेना ९४ भाजपा ८५
काँग्रेस ३० राष्ट्रवादी काँग्रेस ९
समाजवादी ६ एमआयएम २
मनसे १

Web Title: 3 of the Congress, four BJP corporators, the hanging sword of cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई