कचऱ्याचे ३ डबे सक्तीचे

By admin | Published: April 8, 2016 02:11 AM2016-04-08T02:11:50+5:302016-04-08T02:11:50+5:30

कचऱ्यासाठी दोन डबे ठेवण्याच्या पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी केराची टोपली दाखविल्यामुळे ओला व सुका तसेच ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्याची सक्तीच यापुढे करण्यात येणार

3 containers of waste are compulsory | कचऱ्याचे ३ डबे सक्तीचे

कचऱ्याचे ३ डबे सक्तीचे

Next

मुंबई : कचऱ्यासाठी दोन डबे ठेवण्याच्या पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी केराची टोपली दाखविल्यामुळे ओला व सुका तसेच ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे ठेवण्याची सक्तीच यापुढे करण्यात येणार आहे़ तसेच ओल्या कचऱ्यावर इमारतीच्या आवारातच प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात येणार आहे़ अशी तरतूदच विकास नियंत्रण नियमावलीच्या मसुद्यात करण्यात आली आहे़
कचऱ्याची वाढती समस्या लक्षात घेऊन २००६मध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले़ मात्र गेल्या दशकभरात या मोहिमेला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही़ तर कचरा स्वतंत्र डम्पिंग ग्राउंडवर नेण्याची सोय नसल्याने पालिकेनेही आपल्याच मोहिमेला हरताळ फासला आहे़ त्यामुळे आता २०१४ ते २०३४ या २० वर्षांत शहराचा विकास होत असताना नवीन इमारतींमध्ये कचऱ्यासाठी स्वतंत्र तीन डबे ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे़
ओल्या व सुक्या कचऱ्याबरोबरच ई-वेस्ट, हझार्ड्स म्हणजे ज्वलनशील, धोकादायक वस्तूंचा कचरा, वैद्यकीय कचऱ्यासाठी स्वतंत्र डबा ठेवणे कायद्याने बंधनकारक करण्यात
आले़ (प्रतिनिधी) सोलर वॉटर
हीटरची गरज
हॉटेल, वसतिगृह, कॅन्टीन, प्रयोगशाळा, संशोधन संस्था अशा संस्थांच्या इमारतींच्या गच्चीवर सोलर वॉटर हीटर बसविणे बंधनकारक केले आहे़ या प्रकल्पातून दररोज किमान १०० लीटर पाणी सौरऊर्जेवर गरम होईल, अशी योजना असावी़ यासाठी गरजेनुसार गच्चीवरील ६० टक्के जागा वापरण्याची मुभा असणार आहे़
सूचना व हरकती पाठवा
च्पालिकेने विकास नियंत्रण नियमावलीच्या ९, ११, १२ या तीन भागांचा मसुदा www.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे़ या मसुद्यावर १४ एप्रिलपर्यंत निरीक्षण नोंदविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे़
च्नागरिक ee.dpr.mcgm.dcr@ gmail.com  या ई-मेलवर ही निरीक्षणे नोंदवू शकतात़ तसेच प्रमुख अभियंता (विकास नियोजन), ५वा मजला, नवीन विस्तारित इमारत, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०००१ या पत्त्यावर पाठवावे़

Web Title: 3 containers of waste are compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.