Join us

अंधेरी डीमार्ट परिसरात आढळले ३ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:48 AM

तर दुसरीकडे येथील डीमार्टची गर्दी मध्यरात्री २ ते ३पर्यंत होत असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.

मुंबई : अंधेरी (पूर्व) विजयनगर येथील डीमार्ट परिसरात ३ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे येथील डीमार्टची गर्दी मध्यरात्री २ ते ३पर्यंत होत असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अंधेरी (पूर्व) येथील डीमार्ट येथील गर्दी कमी काही होत नसून ग्राहक कुठलेही नियम पाळत नाहीत. डीमार्ट समोर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील वरदविनायक सोसायटी व मोरेश्वर सोसायटीत कोरोनचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या दोन सोसायट्या सध्या लॉकडाउन केल्या आहेत. त्यामुळे डीमार्टमध्ये होणाºया गर्दीमुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात ‘अंधेरीच्या डीमार्टमध्ये पहाटेपर्यंत सामान घेण्यासाठी लागतात रांगा’ असे ‘लोकमत’च्या गेल्या १२ एप्रिलच्या अंकातमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व्हायरल झाले होते.यावेळी ‘लोकमत’च्या बातमीच्या दणक्याने येथील गर्दी कमी झाली नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर डीमार्टचे लायसन्स रद्द करू असा के(पूर्व)वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी डीमार्ट व्यवस्थापनाला दिलेला इशारा लोकमतच्या १४ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. मात्र अजूनही येथे मध्यरात्री २ ते ३ पर्यंत गर्दी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस