धारावीमध्ये आढळले कोरोनाचे ३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:38+5:302021-07-12T04:05:38+5:30

मुंबई : जगाचे लक्ष वेधून राहिलेल्या धारावीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासकीय आणि सर्वच स्तरावर प्रयत्न केले ...

3 corona patients found in Dharavi | धारावीमध्ये आढळले कोरोनाचे ३ रुग्ण

धारावीमध्ये आढळले कोरोनाचे ३ रुग्ण

Next

मुंबई : जगाचे लक्ष वेधून राहिलेल्या धारावीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासकीय आणि सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असून, याच प्रयत्नांना उल्लेखनीय यश येत आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कधी शून्य, तर कधी दोनएकच्या आसपास आढळून येत असून, रविवारी धारावीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

मुंबई महापालिकेकडून धारावीत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे काम केले जात आहे. यासाठी येथील नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. नागरिकांना सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यास उल्लेखनीय यश येत असून, कोरोना रुग्णांची संख्या शून्य ते तीनच्या घरात आढळून येत आहे.

रविवारी धारावीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. येथे आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ९१६ आहे. दादरमध्ये १५ रुग्ण आढळून आले. येथे आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५६ आहे. माहिम येथे कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आले. येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० हजार ८४ आहे. दरम्यान, येथे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून विविध स्तरावर काम केले जात असून, लसीकरणाचा वेगदेखील वाढविला जात आहे.

ठिकाण / पॉझिटिव्ह रुग्ण / सक्रिय रुग्ण / डिस्चार्ज

दादर / ९७५६ / १२६ / ९४४६

धारावी / ६९१६ / २१ / ६५३६

माहिम / १००८४ / ७९ / ९८०३

एकूण / २६७५६ / २२६ / २५७८५

Web Title: 3 corona patients found in Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.