डहाणूतील छाप्यात ३ कोटी हस्तगत
By admin | Published: November 17, 2016 03:52 AM2016-11-17T03:52:13+5:302016-11-17T03:52:13+5:30
डहाणूतील शब्बीर कुरेशी या रहिवाशाला दुबईहून हवालामार्गे तीन कोटी रूपये आल्याच्या संशयावरून राज्याच्या गुप्तचर खात्याने ताब्यात घेतले
डहाणू : डहाणूतील शब्बीर कुरेशी या रहिवाशाला दुबईहून हवालामार्गे तीन कोटी रूपये आल्याच्या संशयावरून राज्याच्या गुप्तचर खात्याने ताब्यात घेतले. डहाणू गावातील रॉयल पॅलेस इमारती मधील फ्लॅटवर राजस्थान व महाराष्ट्र राज्याच्या गुप्तचर खात्याने आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून
फ्लॅटधारक शब्बीर कुरेशीला ताब्यात घेतले.
सूत्रांच्या माहितीनुसार, कुरेशींचा भाऊ आखाती देशात नोकरी करत होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तेथील सरकारकडून त्याला तेथील चलनात मोठी नुकसान भरपाई मिळाली.
भारतीय चलनात ती ३ कोटी रुपये होती. मी या मयताचा एकमेव वारस आहे, असे कुरेशी यांनी सिद्ध केल्याने ती रक्कम त्यांना मिळाली, ती त्यांनी हवाला मार्गे भारतात आणली. आखाती देशातून ही एवढी रक्कम कुरेशी यांना कशी आणि कोणी व का दिली. याचा संशय गुप्तचरांना आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)