मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील वेशीवर म्हणजे दहीसर जकात नाक्याजवळ तीन कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात येत आहे. याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून, वर्षभरात हे प्रसाधनगृह सेवेत दाखल होईल. मुंबईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या ‘हायवे सुविधा टॉयलेट’चा लाभ घेता येणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहीसर जकात नाक्याजवळ या प्रसाधनगृहाची निर्मिती करण्यात येईल. १२ हजार ९०० चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेत हे प्रसाधनगृह उभारण्यात येईल. हे प्रसाधनगृह सौर ऊर्जेवर चालविले जाणार आहे. त्यामुळे विजेच्या खर्चात बचत होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या सीमेवर शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अशी सुविधा निर्माण करण्याची सूचना केली होती.
मुख्यमंत्र्यांनी केली होती सूचना :
घाटकोपर येथे या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेची ही जागा पडून होती. तिथे अतिक्रमण होण्याची भीती होती. त्यामुळे या जागेचा वापर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता व्हावा, असा विचार आहे.
युरिनल्स- १४ अपंगांसाठी शौचालय (स्त्री, पुरुष प्रत्येकी) - २स्नानगृह (स्त्री, पुरुष) - २तृतीयपंथीयांसाठी वॉशरूम-टॉयलेट –१
महिला शौचालय :प्रसाधनगृहाच्या परिसरात सीसीटीव्हीही लावण्यात येणार आहेत. या परिसरात पार्किंगचीही सुविधा असेल.
पुरुष शौचालय :भविष्यात हे प्रसाधनगृह स्वच्छ, निटनेटके राहावे यासाठी संस्थेची नेमणूक केली जाणार आहे, तसेच या ठिकाणी वाहन चार्जिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. पायल कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यासाठी दोन कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात हे प्रसाधनगृह सेवेत येईल.- नयनीश वेंगुर्लेकर, सहायक आयुक्त, आर उत्तर विभाग