- मनोज गडनीसमुंबई - श्रीलंकेतून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीकडून मुंबई विमानतळावरी सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तीन किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.श्रीलंकेतून मुंबई सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने ते विमान मुंबईत दाखल झाल्यावर अधिकाऱ्यांनी प्रवाशांवर पाळत ठेवली होती. एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानामध्ये हे सोने आढळून आले. कलाम उद्दीन असे आरोपीचे नाव असून तो २८ वर्षांचा आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, २८ वर्षीय तरुणाला अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई
By मनोज गडनीस | Published: January 01, 2024 5:53 PM