राज्यात ३ लाख १५ हजार रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:06 AM2021-05-27T04:06:49+5:302021-05-27T04:06:49+5:30
मुंबई : राज्यात दिवसभरात २३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२,४१,८३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली ...
मुंबई : राज्यात दिवसभरात २३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२,४१,८३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात २४,७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ४५३ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,५०,९०७ झाली असून, मृतांचा आकडा ९१ हजार ३४१ आहे.
एकूण ४५३ मृत्यूंपैकी ३२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. या ४५३ मृत्यूंमध्ये मुंबई ३४, ठाणे २, नवी मुंबई १, पालघर १, वसई विरार मनपा १, रायगड ७, पनवेल मनपा ४, नाशिक ९, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा १, अहमदनगर २३, अहमदनगर मनपा २, जळगाव ८, नंदूरबार २, पुणे ४२, पुणे मनपा १२, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ३९, सोलापूर मनपा ८, सातारा ४५, कोल्हापूर ३१, कोल्हापूर मनपा ३, सांगली १९, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी १३, औरंगाबाद १, जालना ७, हिंगोली ८, परभणी २, लातूर २, उस्मानाबाद ८, बीड १६, नांदेड ७, नांदेड मनपा ३, अकोला १०, अकोला मनपा २, अमरावती ११, अमरावती मनपा १, यवतमाळ ७, वाशिम ३, नागपूर ३, नागपूर मनपा ११, वर्धा १२, भंडारा ४, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा ४ रुग्णांचा समावेश आहे.
राज्य
आजचा मृत्यूदर १.६२
आजचे मृत्यू ४५३
आजचे रुग्ण २४,७५२
सक्रिय रुग्ण ३,१५,०४२
मुंबई
आजचा मृत्यूदर २.४
आजचे मृत्यू ३४
आजचे रुग्ण १३६२
सक्रिय रुग्ण २७,९४३