Join us

फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात तीन लाखांची दंडवसुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 5:57 AM

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अधिकृत रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई :  मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात १६ जून रोजी विशेष तिकीट तपासणी करण्यात आली. यामध्ये एका दिवसात फुकट्या प्रवाशांकडून तीन लाख ८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अधिकृत रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १६ जून रोजी विनातिकीट / अनियमित प्रवाशांच्या ७३३ प्रकरणांत तीन लाखांचा दंड वसूल केला. यामध्ये एसी लोकलमध्ये १३ प्रकरणांत ४०३० चा दंड वसूल केला आहे.  गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 

एसीमध्ये विनातिकीट ४,०३० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर फर्स्ट क्लास मध्ये २१,८०० इतका दंड वसूल करण्यात आला. सेकंड क्लासमध्ये  २,५८,८३५ रुपये दंड तर तिकिटाशिवाय सामान वाहतूक करणाऱ्यांडून ३,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :मुंबई लोकल