तब्बल ३० लाख प्रवाशांना हाेणार 'बेस्ट'च्या नव्या याेजनेचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:03 AM2021-12-17T06:03:07+5:302021-12-17T06:03:30+5:30

पाहा काय आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड व मोबाईल ॲप सुविधा.

3 million passengers will benefit from BESTs new scheme cheap ticket fare | तब्बल ३० लाख प्रवाशांना हाेणार 'बेस्ट'च्या नव्या याेजनेचा फायदा

तब्बल ३० लाख प्रवाशांना हाेणार 'बेस्ट'च्या नव्या याेजनेचा फायदा

Next

मुंबई : बेस्ट उपक्रमाचा बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हव्या असलेल्या फेरीची निवड करू शकणार आहेत. एका दिवसाच्या योजनेपासून जास्तीत जास्त ८४ दिवसांपर्यंतच्या प्रवास योजनेचा यात समावेश आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून दररोज सुमारे २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. 

४० रुपयांत कुठेही
अनेकांना कामानिमित्त दिवसातून अनेकवेळा बसगाडीमधून प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी मॅजिक पास म्हणजे एका दिवसात ४० रुपयांच्या तिकिटावर कुठेही प्रवास करण्याची मुभा होती. 
मात्र बेस्ट उपक्रम आता प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) व मोबाईल ॲप सुविधा आणणार आहेत.

असे घेता येईल कार्ड

  • हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल ॲप डाऊनलोड करुन कार्डला मोबाईल ॲपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.
  • विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. 
  • या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.
  • एका दिवसात दोन फेऱ्यांसाठी नऊ रुपये तर चार फेऱ्यांसाठी १४ रुपये तिकीट असणार आहे.


दर कसे असणार?
दिवस    फेऱ्या     तिकीट दर
१४    ५०    १९९ रुपये
२८    १००    २४९ रुपये
८४    १५०    २९९ रुपये

Web Title: 3 million passengers will benefit from BESTs new scheme cheap ticket fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.