मुंबई : बेस्ट उपक्रमाचा बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हव्या असलेल्या फेरीची निवड करू शकणार आहेत. एका दिवसाच्या योजनेपासून जास्तीत जास्त ८४ दिवसांपर्यंतच्या प्रवास योजनेचा यात समावेश आहे. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून दररोज सुमारे २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करीत असतात.
४० रुपयांत कुठेहीअनेकांना कामानिमित्त दिवसातून अनेकवेळा बसगाडीमधून प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी मॅजिक पास म्हणजे एका दिवसात ४० रुपयांच्या तिकिटावर कुठेही प्रवास करण्याची मुभा होती. मात्र बेस्ट उपक्रम आता प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) व मोबाईल ॲप सुविधा आणणार आहेत.
असे घेता येईल कार्ड
- हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल ॲप डाऊनलोड करुन कार्डला मोबाईल ॲपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.
- विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे.
- या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.
- एका दिवसात दोन फेऱ्यांसाठी नऊ रुपये तर चार फेऱ्यांसाठी १४ रुपये तिकीट असणार आहे.
दर कसे असणार?दिवस फेऱ्या तिकीट दर१४ ५० १९९ रुपये२८ १०० २४९ रुपये८४ १५० २९९ रुपये