लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेले मंगेश राणे (६१), महेश मुंगे (५६) आणि ज्ञानदेव सावंत (८५) यांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ.अली यांनी दिली, तर ममता मुंगा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे. केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर केईएममधून ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मसिना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
येथील गणेश गल्लीमधील तळमजला अधिक चार मजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटात तब्बल १६ जण जखमी झाल्याची घटना घडली. स्फोटात एलपीजी, एलपीजी, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कपडे, घरातील साहित्य जळाले. याचा फटका खोली क्रमांक १७, १६, १७ अ आणि १५ सह कॉमन पॅसेजला बसला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, खोली क्रमांक १७, खोली क्रमांक १६ आणि १७ च्या भिंतीसह या घरांचे मोठे नुकसान झाले. १६ आणि १७ या घरांची भिंत कोसळली.