Join us  

वर्षभरात ३ हजार घरफोड्या

By admin | Published: February 01, 2016 2:42 AM

मुंबईत दररोज दिवसा १ आणि रात्री किमान दोन अशा गतीने घरफोड्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात २ हजार ९७८ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मनीषा म्हात्रे ,  मुंबईमुंबईत दररोज दिवसा १ आणि रात्री किमान दोन अशा गतीने घरफोड्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात २ हजार ९७८ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील अवघ्या हजार गुन्ह्यांची उकल आत्तापर्यंत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावधान राहण्याचे आवाहन मुंबई पोलीस करत आहेत. शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी गस्त वाढविली. आरोपींना पकडण्यासाठी रेल्वे स्थानके, टोल नाके येथे बंदोबस्त वाढविला. मात्र, तरीही नानाविध क्लृप्त्या लढवून घरफोड्या सुरूच आहेत. दिवसभर रेकी करायची, त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्त जेथे नसेल, अशी ठिकाणे शोधून या घरफोड्या होतात. त्यात रात्रीच्या शांततेबरोबरच दिवसा घरे बंद असल्याचा फायदा घेत, या टोळ््या घर साफ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. दिवसा सफाई कामगारांचा खाकी वेश घेऊन ही टोळी मुंबईत शिरत असे व रात्री घरफोड्या करणाऱ्या फासे पारधी टोळीला घाटकोपरमध्ये घरफोडीच्या प्रयत्नात असताना, गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. गेल्या वर्षी २ हजार ९७८ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली. यामध्ये ४२७ घरफोड्या दिवसा घडल्या आहेत. यापैकी अवघ्या १ हजार २४२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. आत्तापर्यंत या आकडेवारीने ३ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्या तुलनेत २०१४ मध्ये ३ हजार ५५ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी १ हजार १६५ गुन्ह्यांचा उलगडा झाला. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये काही अंशी प्रमाण जरी कमी असले, तरी गुन्ह्यांची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. ठोस पुरावे नसल्याने पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यांची उकल करावी लागते.नागरिकांनी सावध राहणे गरजेचेगावी अथवा परदेशी जात असताना शेजारील रहिवासी अथवा नातेवाईकांना घराकडे लक्ष देण्यास सांगणे गरजेचे आहे. शिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या सुरक्षेविषयी उपकरणाचा वापर करणे, इमारतीत सुरक्षारक्षक, तसेच सीसीटीव्ही बसवावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोतच. मात्र, नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.- धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस प्रवक्ते