माहीम चौपाटीवरून ३ टन कचरा जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:09 AM2018-05-02T04:09:05+5:302018-05-02T04:09:05+5:30
अस्वच्छ समुद्र किनारे पर्यटनावर परिणाम करतात. त्यामुळे दादरस्थित विद्यार्थी मल्हार कळंबे यांने ‘बीज प्लीज’ या मोहिमेतंर्गत दादर चौपाटी व माहीम चौपाटी स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याला याकामी इतर विद्यार्थ्यांची मदत मिळत आहे.
मुंबई : अस्वच्छ समुद्र किनारे पर्यटनावर परिणाम करतात. त्यामुळे दादरस्थित विद्यार्थी मल्हार कळंबे यांने ‘बीज प्लीज’ या मोहिमेतंर्गत दादर चौपाटी व माहीम चौपाटी स्वच्छ करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याला याकामी इतर विद्यार्थ्यांची मदत मिळत आहे.
रविवारी मोहिमेंतर्गत माहिम चौपाटीवरून ३ ते ४ टन कचरा जमा करण्यात आला. गेले ३३ आठवडे किनाऱ्यावरुन कचरा उचलण्याचे काम हे विद्यार्थी करत आहे. आतापर्यंत २५ मित्र-मैत्रिणींनी मिळून या मोहिमेंतर्गत सुमारे १२० टन कचरा जमा केला. या मोहिमेत स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांनीही हातभार लावला.
रविवारी मोहिमेचा ३४ वा आठवडा पार पडला. माहीम दर्ग्यामागील समुद्र किनाºयावरुन ३-४ टन कचरा उचलण्यात आला. या वेळी जमा झालेल्या कचºयात ९० टक्के कचरा प्लास्टिकचा आढळून आला. प्लास्टिक बंदी करूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळल्याने विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
ज्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर आणि कचºयाचा साठा झालेला आहे त्याची विल्हेवाट लावण्यात बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे जितके जास्त नागरिक मोहिमेला हातभार लावतील, तेवढे सकारात्मक बदल लवकर दिसू येतील, अशी माहिती बीज प्लीज मोहिमेचे संस्थापक मल्हार कळंबे यांनी दिली.
मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, माहीम बीच कमीटी, जय फाउंडेशन, संगम प्रतिष्ठान, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील रहिवासी सहभागी झाले होते.