वेसाव्यातील ३ वर्षांची चिमुकली आली सुखरूप घरी !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:55 PM2020-04-19T19:55:54+5:302020-04-19T19:56:22+5:30
वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्ली तरुण मंडळाने आणि येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचें जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले
मनोहर कुंभेजकर
मुंबई : वेसावा कोळीवाडा येथे सुरुवातीला एकाच कुटुंबातील सात रुग्ण करोना पॉझिटिव सापडले होते. यानंतर वेसावा कोळी जमात ट्रस्टने संपूर्ण गावात लॉग डाऊन केले. तीन दिवसांपूर्वी अजून त्यांच्या संपर्कातील तीन रुग्ण होते काल पर्यंत एकूण 14 रुग्ण वेसावा गावातील झाले होते.
या संदर्भात काल लोकमत ऑनलाइन आणि आजच्या लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र वेसाव्यातील 3 वर्षांची चिमुकली आणि तिचे काका सुखरूप कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी आल्याने वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्ली तरुण मंडळाने आणि येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचें जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.
करोना तपासणी पॉझिटिव आल्यावर येथील कुटुंबसह त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज काका व 3 वर्षाची पुतणी हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी आल्यावर डोंगरीकर तरुण मंडळाने त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.तर या कुटुंबातील अन्य दोघे देखिल कोरोनामुक्त झाल्याने त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉक्टरांनी केलेले उपाय,दिलेला आत्मविश्वास आणि येथील कोळी समाजाने केलेले साऊरण सहकार्य , यामुळे आम्ही कोरोनातून बरे होऊन आलो असल्याची प्रतिक्रिया या कोरोनामुक्त कुटुंबातील सदस्याने
लोकमतला दिली.
कोरोना मत डरना"तुम्ही करोनाला घाबरू नका मात्र स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते म्हणून तुम्ही सगळ्यांनी घरातच थांबावे , डॉक्टरांना, महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि या करोनाला हरवावे, अशी प्रतिक्रिया या कोरोनामुक्त रुग्णांनी व्यक्त केली
वेसावा गावात करोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आणि कुटुंबातील लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी वेसावा कोळी जमातीने मोठी पावले उचलली आहेत.ट्रस्टने गल्ली विभागांना विश्वासात घेऊन मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी , पोलिस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन लॉक डाऊन नियंत्रित करीत आहेत अशी माहिती राजहंस टपके यांनी शेवटी दिली.