Join us

चेंबूरमध्ये ३० ते ३५ जण निवडणुकीच्या रिंगणात ?

By admin | Published: January 29, 2017 3:30 AM

पूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या पालिकेच्या एम पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५२ (पूर्वीचा १४६) आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या प्रभागात मोठ्या

मुंबई : पूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या पालिकेच्या एम पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५२ (पूर्वीचा १४६) आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणात दलित वस्ती असून पहिल्यांदाच हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे या प्रभागात निवडणुकीमध्ये चुरस रंगणार आहे. महत्त्वाच्या पक्षांसह ३० ते ३५ जण निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पक्षाकडून तिकीट नाही मिळाले तर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणारच, असा निर्धार इच्छुकांनी केला आहे. चेंबूर नाका, भाई-भाई नगर, सिद्धार्थ कॉलनी, वामनवाडी आणि लाल डोंगरचा काही परिसर अशी १५२ प्रभागाची रचना आहे. या प्रभागात काही ठिकाणी उच्चभ्रू वस्ती असून मोठ्या प्रमाणात सिद्धार्थ कॉलनी हा झोपडपट्टीचा परिसर आहे. या झोपडपट्टी परिसरात सुमारे २५ ते ३० हजार मतदार असून हा संपूर्ण परिसर दलित लोकवस्तीचा आहे. पहिल्यांदाच हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने निवडणुकीत रंगत चढली आहे. अनेक स्थानिक कार्यकर्ते, समाजसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाच्या मोठ्या पक्षांमधून उमेदवारीसाठी अर्ज न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सध्या इच्छुक उमेदवार करताना दिसत आहेत. सिद्धार्थ कॉलनीतून ३० ते ३५ जणांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. आतापर्यंत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीकडून रोहित पांडव या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. तर भाजपाकडून आशाताई मराठे आणि सेनेकडून लहू कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. ७० टक्के झोपडपट्टी परिसर असलेल्या या प्रभागामधील रहिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)